हाऊसफुल ४ मध्ये नानाची जागा घेणार भल्लालदेव

0

मुंबई : तनुश्री आणि नाना प्रकरण पूर्ण बॉलीवूडमध्ये खूप जोरात गाजला. तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपानंतर नाना पाटेकरने हाऊसफुल ४ हा चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला होता. दिग्दर्शक साजिद खानवरही लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते. त्यानेही हा चित्रपट सोडला होता. मात्र या चित्रपटात नानाची भूमिका कोण करणार आणि दिग्दर्शन कोण करणार हा खूप मोठा प्रश्न उभारला होता.

नाना पाटेकर साकारत असलेली हाऊसफुल ४ मधील भूमिका आता राणा दग्गुबत्ती करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन साजिद खानच्या जागी फरहाद सामजी करणार आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यासोबत बोलणी सुरू आहेत.त्यामुळे अद्याप याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.