भुसावळ : स्वच्छ भारत अभियानासाठी भुसावळ नगरपालिकेने कंबर कसली असून ऑक्टोबर 2017 पर्यंत शहरातील उघडयावरील शौच बंद करण्याचे लक्ष आहे. 2405 शौचासाठी अनुदान मंजुर असून यातील 530 शौचालये बांधून तयार आहेत असे मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. केंद्र व राज्य मिळून 12 हजारांचे अनुदान शौचालयांसाठी दिले जाते परंतु ऐवढ्या रकमेत शौचालया बांधणे शक्य नसल्याने 14 व्या वित्त आयोगातुन नगरपालिका 5 हजारांचे अनुदान देते. असे 17 अनुदान निश्चीत केले आहे. पालिकेला 2 हजार 405 शौचालयाचे लक्ष असून 1 हजार 597 शौचालयांसाठी अनुदान प्राप्त झाले आहे. यातील 530 पुर्ण आहेत. 1 हजार 409 नागरीकांना 6 हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळाला आहे. तर 523 लोकांना 6 हजार रुपयांचे दोन हप्ते मिळाले आहेत. यातुन 130 लोकांना पुर्ण 17 हजार रुपये अनुदान मिळाले आहे. पहिला टप्पा मिळून काम सुरू केले नाही अशा 858 लोकांना नोटीस दिल्या. त्यापैकी 600 लोकांनी शौचालयाचे बांधकाम सुरू केले आहे. तर 40 लोकांनी अनुदान परत केले आहे. नोटीस देवून सुध्दा बांधकाम सुरू केले नाही अशांना दुसरी निर्वाणीची नोटीस देवून फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे.
वकृत्व, निबंध आणि चित्रकला स्पर्धा घेणार
या अभियानाच्या प्रचार व प्रसारासाठी मुख्याध्यापक आपल्या विद्यालय स्तरावर 3 जानेवारी रोजी ई 8 वी ते 10 आणि 11 वी व 12 वी अशा दोन गटात वकृत्व, निबंध आणि चित्रकला स्पर्धा घेतील.प्रत्येक विद्यालयातील प्रत्येक गटातील विजेत्यांची तालुकास्तरावर स्पर्धा होईल व यातील विजेत्यांना 26 जानेवारी रोजी पारितोषिक देवून गौरविण्यात येईल. याबाबत एक टिम प्रत्यक्ष शाळांमध्ये जावून विद्यार्थ्यांशी वार्तालाप करणार आहे.तसेच विद्यालयांनी मागणी केल्यास लोकरंजन पथनाट्य गृप शाळांमध्ये स्वच्छता व आरोग्य विषयावर पथनाटय सादर करेल. तसेच शुक्रवार 16 पासून शहरात पथनाट्य सादर केले जाणार आहे.
तीन हजारांवर कुटुंबांना शौचालयासाठी मिळणार अनुदान
या अभियानाच्या प्रचार व प्रसारासाठी महिला बचत गट, आशा वर्कर्स, सर्व विद्यालयांचे मुख्याध्यापक यांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. मुख्याध्यापक त्यांच्या शाळेतील ज्या विद्यार्थ्यांच्या घरी शौचालय नाही अशांना सुचवतील. अशा प्रकारे उघडयावरील शौचालय बंदी करता येणे शक्य होणार आहे. 65 आशा सेविकांकडे शौचालय नसल्याने त्यांच्याकडे 200 अर्ज दिले आहेत. महिला बचत गटांकडे 41 अर्ज दिेले गेले आहेत. पालिकेचे 2 हजार 405 शौचालयाचे उद्दिष्ट पुर्ण झाल्यानंतर घनकचरा व्यवस्थापनासाठी 14 व्या वित्त आयोगातून प्राप्त अनुदानातुन अनुदान देवून 3 हजार ते 3 हजार 500 कुटूंबांना शौचालयासाठी अनुदान दिले जाईल.
विशेष स्वच्छता मोहिम
19 डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान शहरात विशेष स्वच्छता मोहिम राबविली जाणार आहे. यात सामाजिक संस्थांना समाविष्ट केले जाणार आहे. 17 डिसेंबरपर्यंत अशा संस्थांनी पालिकेत आपली नोंद करायची आहे. 16 रोजी आजी व माजी नगरसेवकांची विशेष बैठक सकाळी 11 वाजता पालिका सभागृहात होणार आहे. शहरातील कचरा साफ करण्यासाठी पालिका प्रशासन 25 घंटागाडी व 6 ट्रॅक्टर खरेदी करणार आहे. तसेच घरोघरी जावून कचरा जमा करण्याचे कंत्राट देणार आहे.