अमळनेर । समुदाय संचलित हागणदारी निर्मूलन कृती आराखडा निर्मितीसाठी अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील सागर धनाड (श्री छत्रपती शिवाजी पर्यावरण व शेती विकास प्रतिष्ठान जळगाव) आणि श्री दत्त विद्या मंदिर व उच्च माध्यमिक विद्यालय यांनी हागणदारी निर्मूलन आराखड्यासाठी विशेष सभा घेतली आहे. विद्यार्थ्यांना हागणदारीमुक्तीचे महत्व, परिणाम, फायदा यासंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थितांनी हागणदारीमुक्तीची शपथ घेतली. याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी अबदास पाटील, ग्रामपंचायत सदस्य सागर मोरे, सोपान लोहार , विनोद पवार, महेंद्र पाटील यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, अगंणवाडी सेविका, ग्राम रोजगार सेवक उपस्तित होते. सरपंच शीतल पवार, उपसरपंच हर्षल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सभा घेण्यात आली.