हागणदारीमुक्तीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात मनपा अपयशी

0

जळगाव । स्वच्छ महाराष्ट्र अभियान आढावा बैठकीचे आयोजन 1 मार्च रोजी अवर सचिव मिलींद कुळकर्णी यांनी केले आहे. या आढावा बैठकीला आयुक्त जीवन सोनवणे यांना उपस्थित राहण्याचे पत्र देण्यात आले आहे. या पत्रात महानगर पलिकेद्वारे शहर हागणदारी मुक्त होतांना केलेली प्रगती असमाधानकारक असल्याचे म्हटले आहे. राज्याने 31 मार्च 2017 पर्यंत हागणदारी मुक्त क्षेत्र होण्याचे ठरविले आहे. परंतु, जळगाव महानगर पालिकेला देण्यात आलेल्या उद्दिष्ट पुर्ण करण्यात न केल्याने राज्याचा हागणदारी मुक्तीच्या उद्देशाला अडथळा निर्माण होत असल्याचे अवर सचिवांनी स्पष्ट केले. यामुळे सर्वकष आढावा बैठक 1 मार्च रोजी प्रधान सचिव यांनी बोलविले आहे. बैठकीत आयुक्तांना जळगाव महानगर पालिका 31 मार्च पर्यंत हागणदारी मुक्त कशी होणार आहे याच्या कृती आराखड्यासह उपस्थित राहण्याचे कळविण्यात आले आहे.

मनपाने केले 45 टक्के उद्दिष्ट पूर्ण

महानगर पालिकेत 2 आक्टोबर 2014 साली वैयक्तीक शौंचालय बांधण्याची योजना सुरू झाली आहे. याअंतर्गत महानगर पालिकेला 5 कोटी 63 लाख 57 हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. 5 हजार 536 वैयक्तींक शौंचालय बांधण्याचे उद्दिष्ट असतांना केवळ आजपर्यंत 2719 शौंचालयांचे बांधकामपूर्ण झालेले आहे. तर 1130 वैयक्तीक शौचालयांचे काम सुरू आहे. तर 1787 वैयक्तीक शौचालयांचे बांधकाम सुरू झालेले नाही. यातून पहिल्या टप्प्यांत 5636 लोकांना 6 हजार रूपयांचा पहिला हप्ता एकूण 3 कोटी 38 लाख 16 हजार रूपयांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच 211 लोकांना 12 लाख 66 हजार रूपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.