हाडाखेड शिवारातून दहा लाखांचे स्पिरीट जप्त

0

शिरपूर । राज्य उत्पादन शुल्क तसेच शिरपूर पोलीसांनी वेगवेगळ्या कारवाईत स्पिरीट व दारू जप्त केली. राज्य उत्पादन शुल्काने व्हॅनमधून स्पिरीट ड्रम उतरवितांना पकडले तर शिरपूर पोलीसांनी घरांवर छापा टाकून अवैध दारूसाठा जप्त केला. यावेगवेगळ्या कारवाईत मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या गस्तीपथकाने हाडाखेड शिवारातील एका ढाब्याच्या बाजूला उभ्या असलेल्या टँकरवर छापा टाकून साडेसत्तावीस लाखांचे स्पिरीट जप्त केले आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्कचे पथक मुंबई-आग्रा महामार्गावर गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना महामार्गावर स्पिरीटची हेराफेरी चालू असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यावरुन या पथकाने हाडाखेड शिवारातील हॉटेल जय मातादी ढाब्याच्या बाजूला उभ्या असलेल्या टँकरवर छापा टाकला. पी.बी.06/ ए. के. 8626 क्रमांकाच्या टँकरमधून एम.एच. 18 डब्ल्यू 6216 क्रमांकाच्या महिंद्रा व्हॅनमध्ये ठेवलेल्या प्लॉस्टीक ड्रममध्ये स्पिरीट उतरविण्याचे काम सुरु होते. या कारवाईत टँकरमध्ये असलेले 9 लाख 76 हजार किंमतीचे 24 हजार 400 लिटर स्पिरीट 1 लाख 50 रुपये किंमतीची टँकर, 2 लाख 50 हजार रुपये किंमतीची महिद्रा मॅक्स पिकअप व्हॅन व पिकअप व्हॅनमध्ये असलेले 27 हजार रुपये किमतीचे 600 लिटर स्पिरीट असा एकूण 27 लाख 53 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

विनापरवाना मद्यसाठा जप्त
शिरपूर शहरातील गुजराथी कॉम्प्लेक्स समोर भरवस्तीत बाबुजी कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या एका घरातून शिरपूर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरुन विनापरवाना ठेवलेला तब्बल 63 हजार रुपयांची देशी विदेशी दारू व बिअर जप्त केली. या कारवाईत दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. शहरातील बाबुजी कॉम्प्लेक्समधील एका घरात विनापरवाना मद्यसाठा असल्याची गुप्त माहिती शिरपूर पोलिसांना मिळाल्याने दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास पोलिस निरक्षक संजय सानप यांना मिळाली. त्याच्यासह पोलिस उपनिरिक्षक किरण बर्गे, रविंद्र शिंपी, अखिल पठाण, प्रशांत बागले, प्रविण गोसावी, मुकेश पावरा यांनी सिटी सर्व्हे नं.104-1 या बाबुजी कॉम्प्लेक्समधील घराजवळ जावून आवाज दिला.

उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
याप्रकरणी टँकर चालक सरवनसिंग स्वर्णसिंग सखू (वय 35) रा. चंबाखुर्द (पंजाब), व्हॅन चालक विजय लालसिंग पावरा (वय 30), गिताराम उमराव पावरा (वय 26) दोघे रा. फत्तेपूर ता. शिरपूर यांना अटक करण्यात आली आहे. आज पहाटे राज्य उत्पादन शुल्कच्या आयुक्त डॉ. अश्‍विनी जोशी, संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, राज्य उत्पादन शुल्क धुळ्याचे अधीक्षक मनोहर अंचुळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक व्ही. बी. पवार, डी. एम. चकोर, एम. एम. कावळे, दुय्यम निरीक्षक बी. जी. अहिरे, एस. डी. मराठे, अनिल बिडकर, एल. एम. धनगर, एस. एस. गोवेकर, शांतीलाल देवरे, के. एम. गोसावी, गिरीष पाटील, गोरख पाटील, अमोल भडागे, प्रशांत बोरसे, अमोल धनगर, कपिल ठाकूर, आर. बी. चौरे, विजय नाहिदे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास सीमा तपासणी नाका हाडाखेडचे दुय्यम निरीक्षक बी. जी. अहिरे करीत आहेत. या कारवाईत टँकरमध्ये असलेले 9 लाख 76 हजार किंमतीचे 24 हजार 400 लिटर स्पिरीट 1 लाख 50 रुपये किंमतीची टँकर, 2 लाख 50 हजार रुपये किंमतीची महिद्रा मॅक्स पिकअप व्हॅन व पिकअप व्हॅनमध्ये असलेले 27 हजार रुपये किमतीचे 600 लिटर स्पिरीट असा एकूण 27 लाख 53 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केले आहे.

घराच्या झडतीत आढळला अवैध दारूसाठा
आवाज दिल्यावर त्या घरातून एक व्यक्ती बाहेर आली. त्याला नाव विचारले असता किरण सुरजमल बजाज असल्याचे त्याने सांगितले. या घरातील झडती घेतली असता घरातून कांगारु माईल्ड बिअरचे प्रत्येकी 90 रुपये किंमतीचे 12 बाटली असलेले 32 हजार 400 रुपये किमतींचे 30 खोके, ईम्पेरियल ब्ल्यु विस्की नावाच्या 48 बाटल्या 150 रुपये प्रमाणे 7 हजार 200 रुपये किमतीच्या, बँगपायपर डिलक्स व्हिस्की 130 प्रमाणे 10 हजार 400 किमतीच्या 80 बाटल्या, वोल्काच्या प्रत्येकी 52 रुपये प्रमाणे 936 रुपयांच्या 18 बाटल्या, कांगारु प्रिमियम माईल्ड बिअरचे प्रत्येकी 60 रुपये प्रमाणे 2 हजार 760 रुपयाचे 46 पत्री टिन, कंगारु 1000 स्ट ्राँग बिअरच्या प्रत्येकी 110 प्रमाणे 2 हजार 640 किंमतीच्या 24 बाटल्या तर मॅकडॉव्हल नं.1 प्रत्येकी 150 रुपये प्रमाणे 7 हजार 200 रुपयांच्या 48 बाटल्या असा एकूण 63 हजार 526 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दोघांविरोधात गुन्हा दाखल
बजाज याच्याकडे अधिक चौकशी केली असता हा सर्व माल हा त्याच कॉम्प्लेक्समध्ये राहणारे संजय पुरुषोत्तम जैस्वाल यांच्या मालकीच्या असल्याचे त्याने सांगितले. याबाबत पोकॉ.समिर नाना पाटील यांनी शिरपूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन किरण सुरजमल बजाज व संजय पुरुषोत्तम जैस्वाल या दोघांच्या विरोधात मुंबई प्रोव्हीशन कायदा कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.