भुसावळ- बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल हाणामारीच्या गुन्ह्यात दोघा पसार आरोपींच्या बाजारपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या. चंद्रकांत मकुंदा चौधरी (38, रा.चक्रधर नगर, भुसावळ) व सुमित बबन चौधरी (21, रा.श्रीराम नगर, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ही कारवाई अपर पोलिस अधीक्षक लोहित मतानी, उपविभागीय पोलिस अधिकारी गजाजन राठोड, बाजारपेठ पोलिस देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे हवालदार युवराज नागरुत, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, रवींद्र तायडे आदींच्या पथकाने केली.