जळगाव । जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सोमवारी सकाळी झालेल्या हाणामारींच्या घटनांमध्ये तिन जण गंभीर जखमी झाले आहेत. या तिनही जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.
दरम्यान, जखमींना हाता-पायाला गंभीर दुखापत झाली आहे. पाचोरा तालुक्यातील मोंदाळे येथील रहिवासी धनराज हिंमत पाटील, ताराबाई तुकाराम तायडे, नरेश सदाशिव भिल्लारे हे तिघेही वेगवेगळ्या हाणामारीच्या घटनांमध्ये सोमवारी 20 रोजी सकाळी जखमी झाले.