भुसावळ– भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल हाणामारीच्या गुन्ह्यात पसार झालेल्या आरोपीस अटक् करण्यात आली. प्रल्हाद होलाराम सचदेव (32, रा.पंचशील नगर, भुसावळ) असे त्याचे नाव आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, बाजारपेठचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आनंदसिग पाटील, नाईक प्रवीण ढाके, कॉन्स्टेबल विकास सातदिवे आदींनी ही कारवाई केली. तपास हवालदार देवानंद मगरे हे करीत आहेत.