हाणामारी प्रकरणी 41 जणांवर गुन्हा दाखल

0

धुळे । तालुक्यातील अंचाळे तांडा गावात परवा दोन गटात हाणामारीची घटना घडली. या प्रकरणी तालुका पोलिसात परस्परविरोधी तक्रार दाखल झाली असून दोन्ही गटातील 41 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अंगणवाडी सेविका कविता वंजारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बुधवारी 4 रोजी सकाळी 9 वाजता गावातीलच बंडू भिला जाधव, दरबार बंडू जाधव, शिवाजी मांगू जाधव, गुलाब मांगू जाधव, अनिल सरदार जाधव, दिनेश नगराज जाधव, कनिलाल शिवाजी जाधव, युवराज आप्पा जाधव, राकेश फुलसिंग जाधव, कल्पेश फुलसिंग जाधव, फुलसिंग मांगू जाधव, गुमान अब्रु जाधव, मनोज बंडू जाधव, नरेंद्र शिवाजी जाधव, विनोद बद्रीनाथ जाधव, अमिन गुमान जाधव, लिलाबाई गुलाब जाधव, संगिताबाई दरबार जाधव, संगिताबाई फुलसिंग जाधव, ताईबाई मिश्रीलाल जाधव, सगुनाबाई नगराज जाधव यांनी शिविगाळ करीत धक्काबुक्की केली. यावेळी सगुनाबाईने चपलेने मारहाण केली.तर दरबार बंडू जाधव याने दिलेल्या तक्रारीनुसार एकात्मिक प्रकल्प अधिकारी यांना अंगणवाडी सेविकेबाबत माहिती दिली.

दोन गटात मारहाण
राग येवून देशमुख गोबरु पवार, कविता देशमुख पवार, रामभाऊ गोबरु पवार, विशाल देशमुख पवार, रोहित देशमुख पवार, अर्चना रामभाऊ पवार, अश्‍विनी रामभाऊ पवार, भगवान गोबरु पवार, शिलाबाई रामभाऊ पवार, ममराज भोमा जाधव, जिजाबाई ममराज जाधव, संजय ममराज जाधव, मालीबाई ममराज जाधव, रायमल नरसिंग जाधव, भारती संजय जाधव, गोदाबाई प्रेमराज राठोड, संजय भिला पवार, नंदू भिला पवार, सुभाष दशरथ पवार, पिंटीबाई संजय पवार यांनी शिविगाळ करीत मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या दोन्ही परस्परविरोधी तक्रारीची दखल घेत तालुका पोलिसांनी दोन्ही गटातील मिळून तब्बल 41 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. शिवाय तपास हे.कॉ.बी.बी.चौधरी व असई आर.बी.वाघ यांना सोपविला आहे.