हातगाड्यांसह दुचाकी चालकांवर कारवाई

0

जळगाव । रात्री उशिरापर्यंत रेल्वे स्थानक परिसरात खाद्य पदार्थांच्या गाड्या तसेच टपर्‍या, हातगाड्या सुरू असतात. त्यामुळे नेहमी हुमरी तुमरीच्या घटना घडतात. याप्रसंगातुन मंगळवारी रात्री जलसंपदामंत्रांनाही जावे लागले. मात्र जलसंपदामंत्र्याच्या फोनवरुन दिलेल्या माहितीवरून पोलीस दलाने रात्रभर कारवाईची मोहीम हाती घेत विनाकारण रेल्वेस्थानकाजवळ येणार्‍या वाहन चालकांवर तसेच हातगाड्या लावणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

4 हातगाड्या जमा तर 16 मोटारसायकलकांवर दंडात्मक कारवाई
मुंबई येथे विदर्भ एक्सप्रेसने जायचे असल्याने मंगळवारी रात्री राज्याचे जलसंपदामंत्री ना.गिरीष महाजन हे त्यांच्या कारने जळगाव रेल्वेस्थानकावर मंगळवारी रात्री आले. त्यांचे वाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून वळण घेत असतांना एका दुचाकीचा कट त्यांच्या वाहनाला लागला. यावरुन दुचाकी चालकाने मंत्री महोदयांच्या कारवरील चालकाशी किरकोळ वाद घातला. यानंतर जलसंपदामंत्र्यांनी पोलीस अधिक्षकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर संबधीत तरुण त्याठिकाणाहुन पसार झाला. दरम्यान डीवायएसपी सचिन सांगळे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर, सपोनि दिपक गंधाले यांच्यासह कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अस्थापना बंद नंतर उशिरापर्यंत खाद्यपदार्थांच्या गाड्या टपर्‍या चालु ठेवल्याने चार हातगाड्या पोलीसांनी जप्त केल्यात. तसेच पवन सोनवणे (वाणी रा. गेंदालाल मिल), सय्यद एैसान हैदर अली (रा. शिवाजीनगर) यांना पोलीसांनी रात्री चौकशीसाठी शहर पोलीस ठाण्यामध्ये नेले. रात्री उशिरापयर्ंत दुकाने चालु ठेवल्याने मुंबई पोलीस अधिनीयमचे कलम 31 डब्ल्यु/131 प्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच रेल्वे स्थानकावर रात्री उशिराने ट्रीपल सीट येणार्‍या दुचाकी चालकांविरुध्द पोलीसांनी रात्रभर कारवाईची मोहीम होती घेतली. विनाकारण रेल्वेस्थानकावर येणार्‍या 16 दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर प्रत्येकी 200 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.