बोदवड। अहमदनगर जिल्ह्यातील हातगावं कांबी येथे 14 वर्षाच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याचा निषेध नाभिक महामंडळातर्फे करण्यात आला. यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तसेच संभाजी भराट या नराधमास कठोर शिक्षा करून पीडीत तरुणीच्या कुटूंबीयास न्याय मिळण्याची मागणी करण्यात आली.
पीडीत कुटूंबास पोलीस संरक्षण द्याव
पिडीताला आर्थिक मदत करण्यात येऊन कुटूंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे, हा खटला जलद गती न्यायालयात चालविण्यात यावा, या खटल्यासाठी सरकारी वकिल म्हणून अॅड.उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी देखील करण्यात आली.