हातचलाखीने एटीएम बदलून तीस हजारांचा घातला गंडा

0

जळगाव । एटीममध्ये असलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्याने अग्निशमन विभागाच्या कर्मचार्‍याला धक्का मारून एटीएम कार्ड खाली पाडून ते हातचालाखीने बदलून घेतले. यानंतर काही मिनिटातच चोरट्यांनी त्या एटीएम कार्डच्या सहाय्याने दुसर्‍या एटीएम मशिनवरून पैसे काढून कर्मचार्‍याला 30 हजार रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी तरूणाने एमआयडीसी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

एमआयडीसी पोलिसात दिला तक्रारी अर्ज
महानगरपालिका अग्निशमन विभागातील कर्मचारी किरण सुभाष शिंदे हे 24 जून रोजी शनिवारी दुपारी 3.48 वाजेच्या सुमारास अंजिठा चौफुली जवळील अ‍ॅक्सीस बँकेच्या एटीएमवर पैसे काढण्यासाठी आले. एटीएम मशिनमधून 10 हजार रुपये काढले आणि बाहेर निघत असतांनाच गर्दीचा फायदा घेत अज्ञात इसमाने त्यांना धक्का मारला. त्यात त्यांचे अ‍ॅक्सीस बँकेचे एटीएम कार्ड खाली पडले. धक्का मारणार्‍या इसमाने खाली पडलेले कार्ड उचलून किरण शिंदे यांना परत दिले. मात्र, दुपारी 3.59 वाजता 10 हजार रुपये विड्रॉल केल्याचा मेसेज त्यांना मोबाईवर आला. पुन्हा एक मिनटानंतर 4 वाजता त्यांना दोन वेळस पुन्हा 10-10 हजार रूपये काढल्याचे मेसेज आले. शिंदे यांना त्यांची फसवणूक झाल्याचा संशय झाला. एटीएम कार्ड तपासल्यानंतर ते दुसरेच एटीएम असल्याचे दिसून आले. त्या अज्ञात इसमाने हातचालाखीने एटीएम कार्ड काढून आपली फसवणुक केल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान, चोट्यांनी तीन वेळेस ट्रान्झॅक्शन करून अग्निमशन विभागाचे कर्मचारी किरण शिंदे यांना तीस हजार रूपयांचा गंडा घातला. दरम्यान, याप्रकरणी किरण शिंदे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.