हातभट्टींवर धाड टाकून 45 हजारांची रसायनसह दारू जप्त

0

साक्री। पिंपळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील चिकसे-जिरापूर गावचे शिवारात पांझरा नदीपात्रालगत गावठी हातभट्टी दारु शोध मोहीम राबविण्यात आली. त्या दरम्यान प्रविण बाबुलाल निकम रा. काकासट भिलाटी व पिंटू जान्या सोनवणे रा. लोणेश्वर भिलाटी पिंपळनेर हे भट्टी पेटवुन गावठी हात भट्टीची दारु तयार करताना मिळुन आले आहे.

अवधान येथील तरुणी बेपत्ता
धुळे येथील अवधान परिसरात रहाणारी प्रियंका बंडोपंत मेश्राम 23 वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे. दरम्यान,अनिता बंडोपंत मेश्राम यांनी फिर्याद दिली. त्यानुसार मोहाडी पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली. प्रियंका क्लासला जाते असे सांगून घरातून गेली असता ती परत आली नाही म्हणून तपासाअंती मिळून न आल्याने मिसींगची नोंद करण्यात आली आहे.

व्यसनाला कंटाळून तरूणाची आत्महत्या
धुळे शहरातील साक्री रोडाला लागून असलेल्या मोतीनाला जवळ राहणार्‍या एका तरूणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दि. 10 रोजी सकाळी उघडकीस आली. दरम्यान तरूणाने व्यसनाला कंटाळून आत्महत्या केल्याचे बोलले जात असून याप्रकरणी शहर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. साक्रीरोडवरील मोतीनाला जवळराहणार्‍या सुभाषभिवसन रायते 37 या तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. मयत सुभाष हा होजिअरीचा व्यवसाय करीत होता. त्याला दारुचे व्यसन असल्याने व्यसनाला कंटाळून त्याची पत्नी ही माहेरी निघून गेली होती. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास सुभाष रायते याने घरात दोर बांधून गळफास घेतला. दरम्यान ही घटना सकाळी त्याच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्याने त्यांनी शहर पोलिसात खबर दिली. त्यानुसार शहर पोलीस स्टेशनचे पी.आय.अनिल वडनेरे, एएसआय राजेंद्र माळी, हे.कॉ.ए.पी.सोनवणे, महेश जाधव, सोनार यांनी घटनास्थळी जावून या घटनेसंदर्भात नोंद करण्यात आली असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत. त्याच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, चार भाऊ असा मोठा परिवार आहे.

ताब्यात घेतलेला मुद्देमाल
120 लिटर गावठी हात भट्टी ची दारु, 08 पत्र्यांचे मोठे ड्रम, 04 प्लास्टिक ड्रम, 85 लहान पञ्याचे डब्बे, 12 प्लास्टिक कॅनसह गावठी हातभट्टीची दारु तयार करण्याचे रसायन व साधनसामग्री असे एकुण 44640 रु किमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट केला असुन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच सकाळी 08.30 सुमारास चिकसे रोडवर ईसम नामे जगन शामा शिंदे रा. पानथळ भिलाटी हा गावठी हातभट्टी ची दारुची वाहतुक करताना मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले आहे. त्याचे ताब्यात 30 लिटर गावठी हातभट्टी ची दारु 1200/- रु किमतीची मिळुन आली आहे.