कल्याण : कल्याण पश्चिमेकडील उंम्बर्डे गाव येथील म्हसोबानगर येथील घरात सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी छापा मारला असता या ठिकाणी कैलास कारभारी हा बेकायदा गावठी हातभट्टीची दारू जवळ बाळगून विक्री करत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी कारभारी याला ताब्यात घेत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.