चाळीसगाव । तालुक्यातील हातले येथे वादळी वार्यासह आलेल्या जोरदार पावसामुळे भिंत कोसळून मातीच्या ढिगार्याखाली 75 वर्षीय पार्वताबाई बुटा खैर या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना 31 रोजी घडली होती. त्या वृद्धेच्या कुटुंबाला शासनाची मदत म्हणून 4 लाख रुपयाचा धनादेश रविवारी 4 रोजी आमदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. पार्वताबाई यांच्या सोबत त्यांचा मुलगा अंकुश खैरे (50), सुन वालाबाई खैरे (45) नातु ऋषिकेश खैरे (16) हे दाबल्या गेले होते. गावकर्यांनी लागलीच मदत करून त्यांना ढिगार्यातू काढले. शासनाकडे पाठपूरवठा केल्याने शासनाकडून त्यांच्या कुटुंबियांना 4 लाखाची मदत जारी करण्यात आली. यावेळी तहसीलदार कैलास देवरे, पंचायत समिती उपसभापती संजय पाटील, तलाठी सचिन मोरे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.