मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर साधला निशाणा
जळगाव- ‘ऑधे ईधर जाव, ऑधे उधर जाव और बाकीके मेरे पिछे आवो’ अशी स्थिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची आहे. ते हातवारे करत नटरंग सारखे करतात तसे आम्ही करत नाही अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांवर निशाणा साधला.दरम्यान,पहेलवान कोन आहे हे येत्या 24 तारखेला महाराष्ट्रातील जनता दाखवून देईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
जळगावात झालेल्या महाजनादेश संकल्प सभेत ते बोलत होते. प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धकडती पुतळयाला पुष्प अर्पण करण्यात आले. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जळगावातील पहिली सभा आहे. ही विजयी सभा असून महायुतीचेच सरकार पुन्हा येईल असा आशावाद फडणवीस यांनी व्यक्त केला. आमच्यासमोर कुस्ती लढायला कुणीच नसल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर केली होती. या टीकेला सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमधील सभेत शरद पवार यांनी उत्तर दिले. ’कुस्ती पैलवानांशी होते, या ’अशांशी’ होत नाही’ असे म्हणत पवारांनी हातवारे केले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी जळगावमधील सभेत पवारांचा चांगलाच समाचार घेतला. मुख्यमंत्री म्हणाले की,महाराष्ट्रात पवारांना आता पराभव दिसू लागल्याने त्यांची विवेकबुद्धी कमी व्हायला लागली. म्हणून शरद पवार कशा प्रकारे हातवारे करून बोलत आहेत हे आपण काल बघितले. उत्तर आम्हालाही देता येतात. पण असे हातवारे आम्ही कधी केले नाही. आम्ही नटरंगसारखे काम कधी केले नाही. त्यामुळे आम्ही हातवारे करू शकत नाही. आणि आम्हाला असे हातवारे करणेही शोभत नाही. असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
राहुल गांधींवर टीकास्त्र
महाराष्ट्र आणि हरियानामध्ये विधानसभेची निवडणूक आहे. निवडणूक आली त्यामुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी कुठेतरी प्रचार करत असतील असे वाटले. मात्र ते बॅकाकला फिरायला गेले.तर दुसरीकडे सलमान खुर्शिदच म्हणतात की,नेतेच बॅकाकला तर जनतेसमोर आम्ही काय थोबाड घेवून जाणार अशी ही काँग्रेसच्या नेत्यांची स्थिती असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
सिंचनाचा बॅकलॉग भरुन काढणार
गेल्या पाच वर्षाच सरकारने शेतकर्यांची कर्जमाफी केली.शेतकर्यांना अनुदान दिले. उत्तर महाराष्ट्रात सिंचनाचा बॅकलॉग भरुन काढण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्ह्यात जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या नेतृत्वात सिंचनाचे मोठ्या प्रमाणात कामे झालीत.अजूनही खूप कामे करायची आहेत.सहा हजार कोटींचा मेगा रिचार्ज प्रकल्प राबविणार आहे.नार-पार आणि गिरणेचे काम पूर्ण करु.शेळगाव बॅरेजचे काम पूर्ण करुन प्रत्येक शेतकर्यांना पाणी देवू जेणे करुन सिंचनाचा बॅकलॉग राहणार नाही असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आम्ही जे जे सांगितले ते ते काम पूर्ण केले आहे. मनपा पूर्णपणे रसातळाला गेली होती.मात्र आम्ही कर्जमुक्त करु असे आश्वासन दिले होते.त्य अनुदान देवून मनपाला कर्जमुक्त केल्याचेही त्यांना सांगितले.
यांची होती व्यासपीठावर उपस्थिती
जळगावात झालेल्या सभेत व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,जलसंपदामंत्री गिरीष महाजन,सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील,खासदार रक्षा खडसे,खासदार उन्मेष पाटील,खासदार सुभाष भामरे,खासदार सी.आर.पाटील,आ.राजूमामा भोळे,आ.हरीभाऊ जावळे,आ.शिरीष चौधरी,आ.संजय सावकारे,आ.स्मिता वाघ,डॉ.गुरुमुख जगवाणी,ना.चिमनराव पाटील,आ.किशोर पाटील,जि.प. अध्यक्ष उज्जवला पाटील,उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन,महापौर सीमा भोळे,उपमहापौर अश्विन सोनवणे,रोहिणी खडसे-खेवलकर,लताताई सोनवणे,मंगेश चव्हाण , रमेश मकासरे उपस्थित होते.सुत्रसंचलन अशोक कांडेलकर यांनी केले.
उद्योग निमिर्तीसाठी प्रयत्न करणार- आ.राजूमामा भोळे
जळगाव शहराचा विकास करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला.विकासासाठी 1100 कोटींचा आणला.समांतर रस्त्याचा विषय मार्गी लावला.गाळ्यांचाही प्रश्न मार्गी लावला असल्याचे आमदार राजूमामा भोळे म्हणाले.शेवटच्या घटकापर्यंत पोहचून समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे.नेत्यांच्या आर्शीवादाने पून्हा संधी मिळाली आहे.येत्या काळात नवीन उद्योग आणि व्यवसाय आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ.राजूमामा भोळे म्हणाले.
अखंड भारताचे स्वप्न पूर्ण होतील-ना.हरिभाऊ जावळे
मोदी सरकारने जनधन योजनेच्या सर्वांचे बँक खाते उघडले.गेल्या पाच वर्षात सबका साथ,सबका विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे.येत्या पाच वर्षात सबका विश्वास मोदी जिंकतील आणि असंड भारताचे स्वप्न पूर्ण करतील असे ना.हरिभाऊ जावळे म्हणाले. मोदी सरकारने 370 कलम हटवून सर्वांना समान हक्क देण्याचा प्रयत्न केला असल्यातचेही ते म्हणाले.यावेळी चिमनराव पाटील,खासदार उन्मेष पाटील,रमेश मकासरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
अन मोदींनी जळगाव जिल्हावासियांना जिंकले
विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जळगावात सभा झाली.मोदींना पाहण्यासाठी आणि त्यांना ऐकण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.मोदींच्या भाषणाला सुरुवात होताच त्यांनी मराठीमध्ये ‘कसं काय जळगावकर’ असे म्हणत अभिवादन केले आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात ’मोदी…मोदी….मोदी’ जिल्हावासियांनी दाद दिली.’महारा÷ष्ट्र महाजनादेशासाठी सज्ज झाला आहे. तुम्ही कौल देणार ना महाजनादेशाला’असे मराठीत बोलून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगाव जिल्हावासियांना जिंकले.
अभूतपूर्व गर्दी
महाराष्ट्रात जळगावमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिलीच सभा होती.त्यामुळे मोदी काय बोलतील?काय आश्वासन देतील?यांची उत्कंठा जळगाव जिल्हावासियांना होती. त्यांच्या सभेसाठी अभूतपूर्व गर्दी झाली होती. सभास्थळी प्रवेशद्वारावरच प्रत्येकांची तपासणी केली जात होती.मोदींचे दुपारी 12.15 वाजता आगमन होताच उपस्थितांनी जयघोष केला. यावेळी उपस्थितांनी सुरक्षा व्यवस्था अनुभवली.
कडेकोट सुरक्षा व्यवस्था
जळगावत झालेल्या पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. शहरासह विमानतळ आणि सभास्थळी चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. सभास्थळी प्रत्येकांची मेटल डिटेक्टरच्या माध्यमातून तपासणी करण्यात येत होती.तसेच वाहनांची देखील कसून तपासणी करण्यात येत होती. संपूर्ण परिसराला छावणाचे स्वरुप आले होते.
वाहतूकीची कोंडी,पाच किमी वाहनांची रांग
पंतप्रधान मोदींच्या सभेला मोठी गर्दी झाली होती.सभा संपल्यानंतर जवळपास पाच किलोमिटर वाहनांची रांग लागली होती.त्यामुळे वाहतूकीची कोंडी देखील झाली होती. दरम्यान,रुग्णाला घेवून जाणारी रुगणवाहिका वाहतूकीत अडकली होती.दरम्यान,पोलिसांनी आणि नागगरिकांनी वाहतूक मोकळी करुन रुग्णवाहिकेला मार्गस्थ केले.