जळगाव : तालुक्यातील एका कंपनीत काम असतांना कंपनीकडून ब्रेक मिळाला. हातचे काम निघाले, त्यातच कुटुंबाची जबाबदारी, उदरनिर्वाहासाठी पत्नीलाही काम करावे लागत असल्याचे शल्य या विवंचनेत शिरसोली प्र.न. येथील आनंदा शिवाजी पांगरे (34) यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दुपारी 2.30 वाजता घडली.
आनंदा पांगरे हा तरूण मुळ दापोरा येथील रहिवासी आहे. कुटुंबासह तो भाडयाच्या घरात शिरसोली येथे वास्तव्यास होता. कंपनीत कामाला जावून तरूण कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असायचा. दरम्यान गेल्या महिन्याभरापासून आनंदा हा घरीच होता. काम नसल्यामुळे आनंदा हा नैराश्यात होता. आज पत्नी वंदना शेतात गेली असताना घरात आनंदा हा घरात एकटाचा होता. गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. दुपारी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तरूणास सिव्हील हॉस्पिटलमध्ये आणले असता वैद्यकीय अधिकार्यांनी आनंदा यास मृत घोषीत केले. आंनदा यास एक अक्षय वय 6 वर्ष मुलगा व मुलगी प्रिया वय 4 वर्ष अशी दोन मुले आहेत. पत्नी वंदना हिस पतीच्या आत्महत्येने जबर मानसिक धक्का बसला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.