एरंडोल: एक वर्ष लोटले तरी सर्वत्र कोरोनाचे थैमान सुरू असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वेळोवेळी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे चहा विक्रेते, कापड दुकान, किराणा दुकान, जनरलस्टोअर्स, दुकाने, या ठिकाणी रोजंदारी ने काम करणारे कामगार , लोट गाडीवरील नाष्टा सेंटर चालक, सायकलीवरून खेड्यावर जाऊन कुल्फी विकणारे, दाळ्या, मुरमुरे, फुटाणे, खारे शेंगदाणे, विक्री करणारे . या हातावर पोट असलेल्या गरीब मजुरांचा बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे या घटकांवर रोजचा उदरनिर्वाह कसा करावा ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने या मजुरांसाठी आर्थिक पॅकेज द्यावे अशी मागणी पुढे येत आहे.
सतत होणाऱ्या लॉकडाऊन मुळे रोजंदारीवर काम करणारे मजूर व किरकोळ विक्रेते यांच्यापुढे मोठे आर्थिक संकट कोसळले आहेत. आजारपण व कुटुंबाच्या चरितार्थासाठी लागणारा खर्च कसा करावा असा प्रश्न त्यांना त्रस्त करीत आहे. विशेष हे की कोरोनाच्या या महामार्गमुळे व लॉकडाऊनमुळे सर्वत्र देण्या-घेण्याचे उधार उसनवारीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. अशा चिंताजनक स्थितीत या घटकांना आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे.
ऑटो रिक्षाचालक, काली पिली चालक , मालवाहतूक गाडी चालक, फोटोग्राफर,यांनी बँकांकडून कर्ज काढून गाड्या घेतल्या सध्या कोरूना काळामुळे प्रवासी बाहेर पडत नसल्यामुळे. व मालवाहतूक सुद्धा मिळत नसल्यामुळे बँकांची हप्ते कसे भरावे असा प्रश्न त्यांना त्रस्त करत आहे तसेच कुटुंबाची रोजची गुजराण ची करावी अशी समस्या त्यांना भेडसावत आहे. वाहनांपासून मिळणारे उत्पन्न बुडत असल्यामुळे मोठा आर्थिक फटका त्यांना बसला आहे.
कोरोना मुळे आमची चहाची टपरी बंद राहिल्याने आमचे गेल्या वर्षभरात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे त्यामुळे आम्ही लोकांकडून कर्ज काढून कुटुंबाचे पालन पोषण करीत आहोत. शासनाने आम्हाला आर्थिक मदत करावी अशी आमची मागणी आहे.
विशाल पाटील, चहा टपरी चालकनवीन कॅमेरा घेतला तोही फायनान्स करून आता लॉक डाऊन असल्यामुळे कोणतेही काम नाही, आम्ही जगायचे कसे, परिवाराचा उदरनिर्वाह करावा हा मोठा प्रश्न आहे
विजय पाटील, फोटोग्राफर एरंडोल