हातोडा पुलाचा भराव खचला

0

तळोदा। तापी नदीवरील हातोडा पुल रहदारी साठी सुरू होत नाही त्याच्या अगोदरच पुलाचा सुरुवातीला करण्यात आलेला भराव खचून ठीक ठीकाणी उंचवटे तयार झाले आहेत. भरावाचे अत्यंत निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. तापीनदी वरील हातोडा पुलाचे काम गेल्या आठ वर्षा पासून सुरु आहे. पुलाचे काम आता अंतीम टप्यातआले असून काही दिवसात पुल वाहातूकीस खुला होणार आहे. यापुलामुळे नंदूरबार तळोदा अतंर हे अवध्या 20 किलोमीटर तर धडगांव नंदुरबार हे अतंर निंम्यावर येवून नागरीकांचा वेळ व पैसा यांची बचत होणार आहे. तळोदा शहर व परिसरातील जनतेची अनेक वर्षांन पासूनची मागणी होती ती पूर्ण होण्यास काही दिवसांचा कालावधी उरला आहे. ह्या पुलाचे काम मागील वर्षीच पूर्ण होणे अपेक्षीत होते. पंरतू राजकीय श्रेयामुळे पुलांचे काम रेंगाळत राहीले. त्यांचा त्रास तालुक्यातील जनतेला सोसावा लागत आहे. तळोदा शहादा रस्त्यावरील गुजराथ हद्दीतील सदगव्हाण गावा जवळील वाकी नदीवरील कमकुवत पुल दुरुस्तीचे काम सुरु असल्याने पुला शेजारून एक कच्चा रस्ता नदीतून तयार करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या अतीवृष्टीत नदीला पूर येवून हा रस्ता वाहातूकीस बंद करण्यात आला होता. नदीचा उगम सातपुडा पर्वत रांगेत असल्यामुळे याभागात पाऊस झाला की नदीला पूर येवून रस्ता बंद होत असतो.

डांबरीकरणात उंचवटे
शहादाकडील वाहतूक बोरद मार्ग, तर नंदुबार- तळोदा, व अंकलेश्वर बर्‍हाणपूर महमार्गांवरील वाहातूक निझर मार्ग वळवावी लागते. यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो आहे. याकडे संबधित विभाग लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहें. कोटयावधी रुपये खर्च करून शासन तापी नदीवर पुल बांधात आहे. पंरतू संबाधित विभागाचा अधिकार्‍यांकडून पुलाचे काम चांगले व्हावे यासाठी प्रयत्नशील राहाणे आवश्यक परंतू नुकत्याच झालेले अतीवृष्टीने पुलाचा सुरुवातीस करण्यात आले भरावर करण्यात आलेल्या डांबरी करणात पावसाचे पाणी जावून भराव ठीकठीकाणी दाबला जावून रस्त्यावर उंचवटे निर्माण झाली आहेत.

संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी
मागील वर्षी पाऊस कमी झाला तरी ऑगस्ट महिन्यात डांबरीकरण करण्यात आले होते. भरावर मोठे खड्डे पडले होते. त्यावेळी संबांधित विभागाने दखल घेतली संबधित ठेकेदारास सूचना करून ते खड्डे बुजण्यात आले होते. परत यावर्षी भराव खचल्याने प्रश्न चिन्ह निर्माण होवून भरावाचे काम योग्य पध्दती न कल्याचे सिध्द होत आहे. आता संबाधित विभाग काय भूमिका घेते या कडे लक्ष लागले आहे.