हातोडा पुलावरून मिनी बस सुरू करण्याची मागणी

0

तळोदा । हातोडा पुल सुरु होवून जवळपास पंधरा दिवसाच्यावर कालवधी लोटला असून या पुलावरुन अजून मोठे वाहान सुरू करण्याच्या दृष्टीने कोणतीच हालचाल शासकीय स्तरावरून होतांना दिसत नाही. या कारणाने राज्य परिवहन मंडळाचा बसेस या मार्गावरून सुरु होवू शकल्या नाहीत. आज ही तळोदा-नंदुरबार बस ही प्रकाशा मार्ग सुरू आहे. यामुळे बसने प्रवाश करणार्‍या प्रवाश्या आर्थिक भुदडं सोसावा लागत आहे. होतोडा पुलावरून लहान चार चाकी व दुचाकी चाकी वाहानांना जाण्याची परवानगी आहे. यामुळे कालीपीली टॅक्सी सेवा होतोडा पुलावरुन सुरू आहे.

प्रतीसीट 35 रू आकारले जाते परतू दुपारून ते नंदूरबारहून तळोदा कडे येण्यासाठी 50 रु प्रती सीट भांडे आकारणी करण्यात येते. या कालीपीली टॅक्सीवाल्यांकडून मनमानी पध्दतीने भांडे आकारणी होत असल्याने प्रवाश्यांना नाहक आर्थिक भूदंड सोसावा लागत आहे. महाराष्ट्र राज्य परिवह महामंडळाने हातोडामार्गे मिनीबस सुरु करण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील नागरीकांमधून करण्यात येत आहे. या बस सेवेमुळे धडगांव तालुक्यातील नागरीक नंदुरबार येथील आपले कामकाज करून दिवसा आपल्या घरी पोहचतील. यातून त्यांच्या वेळेची, पैसा यांची बचत होणार आहे. तरी सबंधित विभागा कडून नंदरबार – तळोदा व नंदूरबार धडगाव मिनी बस होतोडा मार्ग सुरु करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.