हात निर्जंतुक केल्यानंतरच सिद्धिविनायक मंदिरात प्रवेश

0

मुंबई : दादर येथील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सॅनिटायझर देण्यात येणार असून हात निर्जंतूक केल्यानंतरच मंदिराच्या आवारात प्रवेश देण्यात येणार आहे. मंदिरात रोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. कोरोना विषाणूचा प्रसार होवू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी याबाबतची माहिती दिली.

राज्यभरात कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून जत्रा, सोहळे रद्द करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर सिद्धीविनायक मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सॅनिटाझर देण्यात येणार असून त्याने हात निर्जंतूक केल्यानंतरच मंदिराच्या आवारात प्रवेश देण्यात येणार आहे. याशिवाय मंदिर प्रशासन नीट काळजी घेत असून रांगांसाठीचे खांब, आणि फरशी वारंवार निर्जंतूक केली जात आहे.

महाराष्ट्रात आजपर्यंत 20 जण कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये पुणे, मुंबई आणि नागपूरचा प्रामुख्याने समावेश आहे. तर देशभरातील रुग्णांची संख्या 82 वर गेली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये दोन जेष्ठनागरिक नागरिक होते.