हाथरस: उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणावरून संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत आहे. पीडित तरुणीचा काल मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेवरून उत्तर प्रदेश सरकारला प्रश्न केले जात आहे. दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीला आठवड्याभराच्या आता अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
उत्तर प्रदेशचे गृह सचिव भगवान स्वरुप यांच्या नेतृत्त्वात तपास होणार आहे. या समितीमध्ये महिलेसह दलित समाजातील सदस्याचाही समावेश करण्यात येणार आहे. पीडित तरुणीवर अत्यंत क्रूर पद्धतीने अत्याचार करण्यात आले. जीभ कापण्यात आली असून शरीराचे तुटल्याचे सांगण्यात येत आहे.