BREAKING: पिडीत कुटुंबियांच्या भेटीसाठी जातांना राहुल गांधींना अटक

0

हाथरस: उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. उत्तर प्रदेश सरकारवर टीका होत आहे. दरम्यान आज गुरुवारी १ ऑक्टोबर रोजी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह उत्तर प्रदेश सरचिटणीस प्रियंका गांधी पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी हाथरसला रवाना झाले मात्र तत्पूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचाबंदी लागू करण्यात आल्याने पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली. मात्र राहुल गांधी यांनी पायी रवाना होण्याचा निर्णय घेतल्याने पोलिसांनी त्यांना १८८ अंतर्गत अटक केली आहे. त्यामुळे यमुना एक्स्प्रेस हायवेवर चांगलाच गोंधळ उडाला आहे.

राहुल-प्रियांका गांधी बलात्कार पिडीत मुलीच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी हाथरसला रवाना झाले. मात्र त्याआधीच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आले आहे. पोलिसांनी यमुना एक्स्प्रेस-वेवर राहुल आणि प्रियंका गांधी यांना रोखले. पोलिसांनी रोखल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसोबत पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान यावेळी पोलिसांकडून राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे.