हाथरस बलात्कार प्रकरण: सीबीआय पथक घटनास्थळी दाखल

0

हाथरस: उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका तरुणीवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. देशभर या घटनेच्या निषेधार्थ आंदोलने होत असून दोषींना तत्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपविण्यात आली आहे. सीबीआयने आरोपींविरोधात गुन्हा दाखल केले असून तपास सुरु केला आहे. दरम्यान आज मंगळवारी १३ ऑक्टोंबर रोजी सीबीआय पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. बलात्कार झालेल्या स्थळाची सीबीआय पथकाने पाहणी सुरु केली आहे.

सुरुवातील या घटनेच्या तपासासाठी एसआयटी नेमण्यात आली होती, त्यानंतर सीबीआयकडे हे प्रकरण देण्याची मागणी होऊ लागली. आता सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे.