आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांची माहिती
मुंबई :- राज्यातील सर्व सरकारी रूग्णालयांसाठी हाफकिन बायो-फार्मास्युटीकल्स कॉर्पोरेशन लि. येथील खरेदी कक्ष १५ ऑगस्ट २०१७ पासून कार्यान्वित करण्यात आला आहे. या कॉर्पोरेशन मार्फतच औषधे, उपभोग्य वस्तू, वैद्यकीय उपकरणे यांची खरेदी बंधनकारक करण्यात आली आहे. अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी विधानसभेत दिली.
राज्य सरकारच्या सर्व विभागांनी हाफकिन बायो-फार्मास्युटीकल्स कॉर्पोरेशन मार्फत औषधे खरेदी करण्याचा निर्णय झाल्याबद्दल विधानसभा सदस्य बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, डी.पी. सावंत आदींनी तारांकित प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देतांना आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत म्हणाले हाफकीन मार्फत खरेदी प्रक्रिया पूर्ण होवन औषधांचा पुरवठा होण्यास काही काळ लागणार असल्याने रूग्णसेवेत अडथळा येवू नये यासाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या १७ जानेवारी २०१८ च्या निर्णयानुसार औषधी विषयक बाबींच्या संपुष्ठात आलेल्या दरकरारांना ३१ जानेवारी २०१८ पर्यंत किंवा हाफकीन महामंडळाकडून सुरळीत पुरवठा होईपर्यंत या पैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.