हायमास्टच्या उजेडामुळे वरणगाव शहर होणार प्रकाशमय

0

वरणगाव । स्थानिक विकास निधी योजनेअंतर्गत सन 2017-18 मध्ये भुसावळ मतदार संघाचे आमदार संजय सावकारे यांनी वरणगाव शहरात 30 हायमस्ट लाईट मंजूर करण्यात आले असून त्यांचे उद्घाटन पोलीस स्टेशनच्या आवारात व ग्रामीण रुग्णालय येथून उद्घाटनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी आमदार संजय सावकारे, नगराध्यक्षा अरुणा इंगळे, सुधाकर जावळे आदी मान्यवरांचा वरणगाव पोलीस स्टेशनमार्फत सावदा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

उद्घाटन सोहळ्यास यांची होती उपस्थिती
आमदार संजय सावकारे म्हणाले की, वरणगाव शहरात 75 हायमस्ट लाईटमुळे शहर प्रकाशमय होणार आहे, असे सांगितले. यावेळी नगरसेवक राजेंद्र चौधरी, रविंद्र सोनवणे, बबलू माळी, विकीन भंगाळे, गणेश धनगर, नगरसेविका प्रतिभा चौधरी, रोहिणी जावळे, वैशाली देशमुख, माला मेढे, तळवेलचे सरपंच ज्ञानदेव झोपे, पोलीस स्टेशनचे पीएसआय प्रदिप ठुबे, गोपनीय खात्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल दतात्रे कुलकर्णी, राहुल येवले, सुनील वाणी, आश्विनी जोगी, समाधान चौधरी, राजेश इंगळे, गुड्डू बढे, मिलींद मेढे, महेश सोनवणे, संभाजी देशमुख आदी नगरसेवक व नगरसेविका, कार्यकर्ते उपस्थित होते.

याठिकाणी लागणार हायमास्ट
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पीएसआय निलेश वाघ यांनी केले तर आभार नगरसेवक सुनील काळे यांनी मानले. बंबू वाडा परिसर, एकनाथ भोई यांच्या घराजवळ, आयटीआय जवळ, अख्तर पटेल व मुंजोबा मंदिराजवळ, शिवाजीनगर मधील हनुमान मंदिर, रेणूका नगरमधील रेणूका माता मंदिर, सरस्वती नगर, साईनगर, जालंधर नगर, सरस्वती नगर, मरीमाता मंदिर, रवी पाटील यांच्या घराजवळ, मच्छींद्रनगर, संकटमोचन हनुमान मंदिर परिसर, नेरकर गुरुजी यांच्या घराजवळ, अयोध्या नगर, सम्राटनगर, मातंगवाडा, नवनाथ महाराज मंदिर (सिध्देश्वरनगर) या प्रभागांमध्ये 30 हायमस्ट लाईट लावण्यात येणार आहे.