धरणगाव । येथे आमदार स्मिता वाघ यांच्या स्थानिक विकास निधीतून धरणगाव शहरात नुकतेच हायमास्ट लॅम्प बसविण्यात आले. धरणगाव शहर सर्वत्र प्रकाशमान होत असतांना या आधी देखील खासदार ए.टी.पाटील यांच्या निधीतून हायमास्ट लॅम्प गावातील विविध ठिकाणी बसविण्यात आले होते. संपूर्ण शहर प्रकाशमान होत असतांना काही विशिष्ट भागात मात्र अंधार होता. जनतेची मागणी लक्षात घेवून हेडके गल्ली व नेहरू नगर या दोन ठिकाणी मा.आमदार स्मिताताई यांच्या स्थानिक विकास निधीतून आज रोजी हायमास्ट लॅम्प चे लोकार्पण करण्यात आले. शहरातील मुलभूत सुविधांचे प्रश्न लोकांच्या अपेक्षेप्रमाणे तात्काळ मार्गी लागावे, अशी अपेक्षा नागरिकातून व्यक्त करण्यात आली.
पांडूरंग मराठे, कडू महाजन यांनाही मान
नेहरू नगर येथील हायमास्ट लॅम्प चे लोकार्पण आमदार स्मिता वाघ तसेच डॉ.कुडे यांचे हस्ते करण्यात आले. तसेच हेडके गल्ली येथील हायमास्ट लॅम्प चे लोकार्पण पांडुरंग मराठे व कडू महाजन यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष सुरेखा महाजन यांची उपस्थिती होती. तसेच चंद्रशेखर पाटील, शिरीष बयस, पुनिलाल महाजन, अड.शरद माळी, धरणगाव नगरपालिका गटनेते कैलास माळी, कडू बयस, भालचंद्र महाजन, शरद कंखरे, शहराध्यक्ष सुनील वाणी, सुनील चौधरी, जितेंद्र महाजन, मनोहर पाटील, आबा पाटील, डोंगर चौधरी, दगडू मराठे, वासू महाजन, संतोष सोनवणे, नितीन मराठे, विजय महाजन, सम्राट धनगर, बापू निळे, समाधान धनगर, आर.एम.पाटील, पापा वाघरे, जितेंद्र न्हायदे, दिलीप धनगर, जगन्नाथ वाणी, भरत धनगर, दौलत धनगर आदी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.