हायवेवर गाडी रोखून 4 महिलांवर सामूहिक बलात्कार

0

बुलंदशहर। उत्तर प्रदेशात एक धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. बुलंदशहरात यमुना एक्स्प्रेसवेवर सशस्त्र दरोडेखोरांनी एका कुटुंबाची कार रोखून 4 महिलांवर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे उत्तर प्रदेशात खळबळ उडाली असून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्‍नचिन्हे निर्माण झाली आहेत. गौतमबुद्धनगर जिल्ह्यातील रहिवासी सलीम कुरैशी आपल्या बहिणीला उपचारासाठी रुगलयाच्या दिशेने बुधवारी रात्री निघाले. यावेळी त्यांच्यासोबत कुटुंबातील एकूण 4 महिला प्रवास करत होत्या.

यमुना एक्स्प्रेसवेवर रात्री 12 जणांच्या एका टोळीने कारला घेरले. या टोळक्याने शस्त्रांचा धाक दाखवून चारही जणींवर बलात्कार केला. सलीम कुरैशी यांनी दरोडेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला त्यावेळी सलीम यांच्या छातीत गोळ्या घातल्या. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यानंतर सर्व नराधम महिलांचे दागिने, पैसे घेऊन घटनास्थळावरून पसार झाले. कुटुंबप्रमुखाची हत्या केल्यानंतर या टोळक्याने शस्त्रांचा धाक दाखवून चारही जणींवर बलात्कार केला. त्यात पीडित महिलेच्या एका 13 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.