हार्दिक पटेलची सीडी आणि राजकारण

0

गुजरातमधील राजकारणाने सोमवारी, 13 नोव्हेंबरला खालची पातळी गाठली. हार्दिक पटेलचा एका तरुणीसोबतचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ 16 रोजीचा असून एका हॉटेलच्या खोलीत ते चित्रीत करण्यात आले आहे. हा बनावट व्हिडिओ असल्याचा दावा हार्दिक पटेलच्या समर्थकांनी केला आहे. जर हे सर्व राजकारणातून झाले असेल, तर विरोधक निवडणुका जिंकण्यासाठी किती नीच पातळीवर जाउ शकतात, याचाच हा पुरावा सजला पाहिजे. भाजपला केंद्रात सत्तेवर येऊन तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. भाजपची सत्ता गुजरातमध्येही निर्विवाद आहे. गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला सजला जातो. हार्दिक पटेल या 24 वषार्ंच्या तरुणाने पाटीदार समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍नच उचलून धरला आणि केंद्र सरकारच्या पायाखालची वाळू सरकू लागली. कारण पटेल यांना गुजरातमधून मिळणारी सहानुभूतीची लाट ठरली होती. दोन वर्षांपूर्वी हार्दिक पटेल यांनी गुजरातमध्ये पाटीदार समाजाच्या आरक्षणाबाबत विविध ठिकाणी मोर्चे काढले, सभा घेतल्या. यामुळे हार्दिक पटेल नावाचे वादळ भाजपसमोर आव्हान म्हणून उभे राहिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना हार्दिक पटेल यांची प्रसिद्धी पाहून दरदरून घाम सुटला. नंतर सुरू झाले घाणेरडे राजकारण. हार्दिक पटेल यांच्या सभेतील काही भाषणांचा चुकीचा अर्थ घेऊन पटेल यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे लावले गेले आणि पटेल यांचे तोंड बंद करण्यासाठी भाजप सरकारने त्यांना तुरुंगात टाकले. विरोधकांनी सातत्याने केलेल्या विरोधामुळे व मागासवर्गीय समाजाच्या विरोधामुळे हार्दिक पटेल यांना तुरुंगातून सोडले गेले. भाजप सरकारने हार्दिक पटेल यांच्यावर जास्त प्रमाणात लक्ष केंद्रित केले नसते, तर हार्दिक पटेल यांचे नाव देशात अनेक जणांना माहीतही झाले नसते. परंतु, पटेल यांच्यावर सरकारने देशद्रोहाचे गुन्हे लावून त्यांच्या घटनात्क हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न भाजप सरकारने केला, तोच प्रयत्न भाजपच्या अगदी गळ्याशी आला आहे. हार्दिक पटेल यांच्या या घटनेनंतर गुजरातमधील दलित नेते जिग्नेश मेवानी व अनेक मागासवर्गीय संघटनांनी, एवढेच नव्हे तर काँग्रेस व आदी पार्टीनीही पटेल यांना पाठिंबा दिला. पटेल तुरुंगात गेले आणि भाजपविरोधात गुजरातमध्ये इतर मागासवर्गीय व मागासवर्गीय समाज एकवटला. काँग्रेसने या भाजपविरोधी वातावरणाचा फायदा घेत गुजरातध्ये निवडणुकीच्या प्रचाराची राळ उडवली आहे. आज भाजप पक्षात विरोधकांच्या प्रचार पाहून सर्वजण धास्तावले असल्याचे दिसते. देशातील दोन खासगी सर्वेक्षण संस्थांनी गुजरातध्ये भाजपलाच बहुत मिळाल्याचा अंदाज पसरवला आहे. त्यानंतर एका खासगी संस्थेने गुजरातच्या येत्या निवडणुकीत काँग्रेसची सरशी होणार असल्याचे म्हटले आहे. पाटीदार आंदोलनाला नागरिकांचा पाठिंबा मिळत असल्याचे लक्षात येताच त्यांचा नेता म्हणजे हार्दिक पटेल यांना ‘लक्ष्य’ करण्याचे षडयंत्र भाजप सरकारने सुरू केले आहे. सध्या ज्या बनावट असलेल्या सीडीचा बोलबोला सुरू आहे, तो या षडयंत्राचाच भाग असावा, असे अनेक जणांना वाटते. गुजरातमधील संजय जोशी लोकप्रिय होत असताना भाजपने त्यांना बदनाम करण्याची खेळी खेळली होती.

सोशल मीडियावर हार्दिक पटेल यांचा व्हिडिओ अपलोड करणार्‍या तरुणाने पाटीदार समाजातील अन्य नेत्यांचेही व्हिडिओ माझ्याकडे आहेत, असा दावा केला आहे. व्हायरल झालेल्या कथित सीडीमधील व्हिडिओमध्ये हार्दिक पटेल असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओमधील व्यक्ती हार्दिक पटेल असून, त्याच्यासोबत एक महिलाही असल्याचा दावा सांकडसरिया यांनी केला होता. मात्र, हा व्हिडिओ खोटा असल्याचे हार्दिकने सांगितले होते. हार्दिक पटेलने व्हायरल झालेली सीडी चुकीची असल्याचे 4 दिवसांमध्ये सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान अडिन सांकडसरिया दिले आहे. पटेल यांनी सीडीप्रकरणी भाजपला दोष देण्याऐवजी त्याविरोधात तक्रार दाखल केली पाहिजे. पटेलच्या सीडीबाबतचे सत्य तपासणीअंती बाहेर येईलच. परंतु, गुजरातमधील जनतेला संभ्रात पाडण्याचे विरोधकांनी केलेले घाणेरडे राजकारण भारतीय राजकारणाला वेगळ्या वळणावर नेत आहे, असे अखेर म्हणता येईल.

– अशोक सुतार
8600316798