मुंबई : ‘कॉफी विथ करण’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्यावर चौकशी संपेपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
BCCI च्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी एका वृत्तसंस्थेला याबाबतची माहिती दिली. आक्षेपार्ह विधानानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यामुळे या दोघांवर ही कारवाई करण्यात आली असून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे मालिकेला त्यांना मुकावे लागण्याची शक्यता आहे.