हार्मोनल बदल आणि तणावपूर्ण आधुनिक जीवनशैलीमुळे स्त्रियांना मायग्रेनचा त्रास

1

नवी मुंबई | सध्या 20 ते 45 वयोगटातील एक तृतीयांशपेक्षा अधिक भारतीय महिलांमध्ये मायग्रेनची लक्षणे आढळतात. हार्मोन्समध्ये होणारे बदल आणि आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणारा ताण ही या विकारामागची प्राथमिक कारणे आहेत. मुली वयात आल्यानंतर त्यांच्यात मायग्रेन वाढीची लक्षणे दिसून येतात. साधारणपणे 75% महिलांना मासिक पाळीदरम्यान मायग्रेन संबंधित डोकेदुखीचा सामना करावा लागतो. काही महिलांना पहिल्या गर्भधारदरम्यान तिसऱ्या महिन्यात देखील हा त्रास जाणवतो. उत्तरार्धात शेवटच्या तीन महिन्यात हळूहळू सुधारणा होते.

नेमके कारण स्पष्ट नाही
मायग्रेनचा त्रास नेमका कशामुळे होतो याचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. वैद्यकीयदृष्ट्या त्यात काहीच प्रगती झालेली नाही. याप्रकारातील डोकेदुखी ही बहुदा वाढलेल्या रक्तवाहिन्या आणि मज्जारज्जुंमधून विशिष्ट रसायनांचा स्रावयासारख्या कारणामुळे सुरू होत असेल, असे डॉ बत्राज ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. मुकेश बत्रा यांनी ‘जनशक्ति’ला सांगितले.

‘परफेक्ट’ महिलाच त्रस्त
ज्या महिलांना सगळ्याच गोष्टीत ‘परफेक्शन’ लागते, त्या महिलांना हा त्रास अधिक होतो. या काळात होणाऱ्या
वेदनांपासून मुक्तता हवी असल्यास आधुनिक औषधशास्त्रात वेदनाशामक (पेनकिलर्स) शिवाय इतर पर्याय नाही. मात्र अशा विकाराने त्रस्त असलेल्या रुग्णासाठी होमिओपॅथीमध्ये टिकाऊ आणि प्रतिबंधनात्मक पर्याय आहे.

होमिओपॅथीने उपचार
होमिओपॅथीमध्ये मायग्रेन विकारग्रस्त व्यक्तीवर उपचार करण्याची शक्ती आहे. कारण दोन महिलांमध्ये मायग्रेनची लक्षणे, मानसिक संवेदनशीलता किंवा वैशिष्ट्ये एकसारखी नसतात. होमियोपॅथीमध्ये एक विशेष वैशिट्य आहे, ते कायम उपचारासाठीचे शक्य घटक तपासत राहते. ज्या सुदृढ व्यक्तीत मायग्रेनसदृश्य लक्षणे आढळतात आणि जी व्यक्ती प्रत्यक्षात या विकाराने त्रस्त आहे; अशा दोन्ही व्यक्तींवर होमियोपॅथी औषधांचा प्रभाव एकसारखा होतो. इतर पर्यायांच्या तुलनेत होमियोपॅथी वेगळी ठरते कारण मायग्रेनग्रस्त दोन व्यक्तींना होमियोपॅथीमध्ये एकच उपाय सुचवला जात नाही. जसे की, एखाद्याला डोक्याभोवती काहीतरी घट्ट गुंडाळल्याने आराम वाटू शकतो; तर दुसऱ्या व्यक्तीला त्यामुळे त्रास होऊ शकतो. त्यामुळे होमियोपॅथीत दोन वेगळे उपाय सुचवले आहेत.

मायग्रेन दर 10 वरून 3
आपण प्लेसबो (डमी गोळी)ची निवड केल्यास डबल-ब्लाइंड प्रकारच्या अभ्यासाचे निरीक्षण नोंदवले. या पद्धतीने मायग्रेनग्रस्त रुग्णांच्या गटावर चार महिने होमियोपॅथीने उपचार केले. प्लेसबो गटातील मायग्रेनग्रस्त पीडितांच्या मायग्रेन वारंवारतेवर परिणाम झाल्याचे निष्पन्न झाले. दर महिन्याला उद्भवणारा मायग्रेनचा दर 9.9 वरून 7.9 इतका झाला. तर होमियोपॅथीचा अवलंब करणाऱ्या समुहात महिन्याला मायग्रेन उद्भभवण्याचे प्रमाण 10 वरून फक्त 1.8-3.0 वर आले.

मायग्रेनची लक्षणे
विशिष्ट कालावधीत उद्भवणारी डोकेदुखी
अतिसार आणि/किंवा उलटी
प्रकाश आणि गोंगाट असल्यास तीव्र संवेदनशील
दृश्य आणि ऐकीव श्रवणविषयक गडबड
हाता-पायांना मुंग्या येणे
झोपेशी संबधित समस्या