हावडा मेलमधून परप्रांतीय प्रवाशाची बॅग लांबवली

0

भुसावळ- हावडा मेलच्या एस-9 या डब्यातून प्रवास करीत असलेले विक्रमसिंग दिनेशसिंग छुरीया (रा. राजतादेगा, बिहार) हे झोपले असताना गाडीने नाशिक रेल्वे स्थानक सोडल्यावर चोरट्यांनी त्यांची बॅग लांबवली. त्यात महत्वाची कागदपत्रे व कपडे होते. नाशिक स्थानक सोडल्यावर रात्री 1.25 मिनीटांनी ही घटना घडली. भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तोे नाशिकरोड जीआरपी पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.