हा काय टेप घेऊन ढगात गेला होता का?

0

मुंबई । शिवसेना सत्तेत आहे, भाजप यांचा मित्रपक्ष आहे. या मुद्द्यांवर पुन्हा एकदा लक्ष वेधत काँग्रेसचे आमदार निलेश राणे यांनी पुन्हा एकादा एका मिश्कील पोस्टमधून शिवसेनेवर निशाना साधला आहे. पत्रकार परिषद घेऊन मुंबईवर 9 किमी उंचीचा ढग होता, सुदैवाने ढगफुटी झाली नाही अशी माहिती देणार्‍या उद्धव ठाकरेंना हा टेप घेऊन ढगात गेला होता, असे मिश्कील ट्वीट केले आहे. हे ट्वीट त्यांनी आपल्या सोशल मिडीयावर शेअर केले आहे. याआधी ही राणे बंधूनी अनेकदा व्यंगचित्रे आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातून निशाना साधला आहे. आजच्या ट्वीटमधून शिवसेना आणि निलेश राणे यांच्यात पुन्हा एकदा नव्या वाद तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सत्ताधारी पक्षाची लक्तरे टांगली
मंगळवारी गेल्या 12 वर्षांपूर्वीच्या 26 जुलै 2005 नंतरच्या तुलनेत झालेल्या अतिवृष्टीत अवघी मुंबई बुडाली. मुसळधार पावसात मनपाच्या नियोजन शून्य कारभारामुळे अवघी मुंबईसह उपनगरे बुडाली असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना कुठे होती? सत्तेच्या खुर्चीत बसून मुंबईत सारेकाही आलबेल आहे अशा वल्गना करणारे कोठे होते? असा सवाल विविध प्रसिध्दी माध्यमांमधून तसेच विरोधकांमधून विचारला जात आहे. याप्रश्‍नांचा भडिमार सहन न होवून उत्तर देण्याची मानसिकता नसलेल्या सत्ताधारी पक्षाची लक्तरे मुंबईकरांसमोर टांगली गेली आहेत. तसेच या आकस्मिक पुरात नाले सफाईचा केलेला फार्स पूरता उघडा पडला. परिणामी पावसामुळे मुंबईची झालेली दैना पहाता मुंबई महापालिकेच्या कामावरही कायमचे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पाऊस ओसरुन गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक घेतली. यावेळी संध्याकाळच्या वेळेमध्ये मुंबईच्या डोक्यावर तब्बल 9 किमी उंचीचा ढग होता. सुदैवाने ढगफुटी झाली नाही. ढगफुटी झाली असती तर परिस्थिती आणखी बिकट झाली असती. महापालिकेने या कठीण परिस्थितीतही चांगले काम केले आहे, अशी शाबासकी उद्धव यांनी दिली. यावर टीका करताना हा काय टेप घेऊन ढगात गेला होता का असा टोमणा निलेश राणे काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी लगावला. आता यानंतर शिवसैनिक आणि उद्धव ठाकरे या टीकेला कसे प्रत्युत्तर देतात याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.