नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष करत असतात, ट्वीटरवरून ते मोदींवर आरोप करत असतात. आता पुन्हा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष केले आहे. सीएए, एनआरसी कायदा केल्यानंतर नाराजी पसरल्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य करतांना देशात छावणी केंद्र (डिटेन्शन सेंटर) नसल्याच्या वक्तव्य केले होते. त्यावर राहुल गांधींनी भाष्य करत मोदींवर निशाणा साधला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंतप्रधान भारतमातेशी खोटे बोलतात, अशा शब्दात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
आसाममधील छावणी केंद्राशी संबंधित बातमी शेअर करत राहुल गांधी यांनी ‘आरएसएसचे पंतप्रधान भारतमातेशी खोटे बोलतात’ असे ट्वीट आज गुरुवारी सकाळी केले आहे.
नरेंद्र मोदींनी दिल्लीच्या रामलीला मैदानातील सभेत, देशात छावणी केंद्राबद्दल पसरवल्या जाणार्या अफवा अगदी खोट्या आहेत असे सांगितले होते. मात्र राहुल गांधींनी शेअर केलेल्या वृत्तानुसार आसाममध्ये एक छावणी केंद्र उभारलेले आहे.