हा तर “जन्नत का पौधा”

0

नवी दिल्ली : मंत्रजप करून चीनचे अगदी सोप्या पद्धतीने निर्दालन करू शकतो असा अहिंसात्मक उपाय परवाच सागणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता मुस्लिमांना घरात आणि घराबाहेर तुळशीचे रोप लावण्याचे आव्हान केले आहे. पवित्र कुराणात स्वर्गातील दिव्य रोपाचे वर्णन आहे ते दुसरेतिसरे काही नसून तुळसच आहे असा दावा संघाचे वरीष्ठ प्रचारक इंद्रेश कुमार यांनी केला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुस्लिमांचे तुलसी प्रेम वाढावे म्हणून अभियान चालवणार आहे. प्रत्येक मुस्लिमाकडे हे स्वर्गीय रोप असावे. मौलाना ही गोष्ट लपून ठेवतात. ते द्वेषच पसरवतात. अरबी भाषेतला रेहान या शब्दाचा अर्थ तुळस असा आहे. त्यामुळे तुळस मुस्लिमांसाठी महत्वाची आहे, असे इंद्रेश कुमार यांचे म्हणणे आहे.