नवी दिल्ली। केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (बुधवार) संसदेत मांडलेला अर्थसंकल्प अगदीच फुसका असल्याची कडवट प्रतिक्रिया काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
राहुल गांधी यांनी भाजपावर जोरदार टीका करताना म्हणाले, या अर्थसंकल्पामध्ये शेतकर्यांसाठी काहीही नाही. शेतकर्यांच्या कल्याणाच्या दृष्टिकोनामधून सरकारची कोणतीही दृष्टी दिसून येत नाही. मनरेगाफ या योजनेबद्दलही सरकारचा मूलभूत गैरसमज दिसून आला. शेतकर्यांसाठी कर्जमाफीही घोषित करण्यात आलेली नाही.
या अर्थसंकल्पामध्ये रोजगारनिर्मितीसाठी नव्या कल्पना मांडलेल्या नाहीत. राजकीय पक्षांना दिल्या जाणार्या देणग्यांमधील भ्रष्टाचार रोखण्याकरिता करण्यात आलेल्या उपाययोजनेस आमचा पाठिंबा आहे. या अर्थसंकल्पाचा निवडणुकांवर कोणताही परिणाम होणार नाही. आम्हाला या अर्थसंकल्पाच्या माध्यमामधून मोठ्या आतिषबाजीची अपेक्षा होती. मात्र हा अर्थसंकल्प अगदीच फुसका निघाला, असे आम्हांला वाटते. मोदी काहीतरी चमत्कार करतील असे वाटले होते मात्र तसे झाले नाही
Prev Post