मुंबई: नागपूर विधीमंडळाचे अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचे दुसरे दिवस आहे. दुसऱ्या दिवशी भाजप आमदारांनी सभागृहात प्रचंड गदारोळ केला. शेतकऱ्यांना तातडीने २५ हजारांची मदत जाहीर करण्याची मागणी करत भाजप आमदारांनी सभागृहात गदारोळ केला. यावेळी भाजप-शिवसेना आमदारांमध्ये धक्काबुक्की देखील झाली. भाजप आमदारांनी मुख्यमंत्र्यांसमोर बॅनर फडकविले. यावरून विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले यांनी नाराजी व्यक्त केली. सभागृहात बॅनर फडकविण्याची घटना ही निंदनीय असून दुसऱ्यांदा जर असा प्रकार घडला तर कारवाई करेल अशी समजवजा इशारा अध्यक्षांनी विरोधी आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना दिला. विरोधकांकडून नियमांची पायमल्ली होणार नाही. विरोधी आमदार संयमाने वागतील याची ग्वाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
विधानसभेच्या कामकाज सुरु झाल्यानंतर दोनदा कामकाज स्थगित करण्यात आले. सुरुवातीला अर्धा तास आणि त्यानंतर दहा मिनिटासाठी कामकाज स्थगित करण्यात आले.