हा विजय तर राम मंदिरासाठी जनादेश

0

नागपूर ।उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपला मिळालेले यश म्हणजे राम मंदिर उभारणीचा जनादेश असल्याचा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते मा.गो. वैद्य यांनी मोदी सरकारला दिला आहे. भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यात राम मंदिर उभारणीचा उल्लेख आहे, त्यामुळे अयोध्येत राम मंदिर उभारणीला तेथील जनतेने मंजुरी दिली आहे , असा या विजयाचा अर्थ काढला पाहीजे,असेही ते म्हणाले.

कायदा बनवला पाहिजे
वृत्तसंस्थेशी बोलताना संघाचे ज्येष्ठ नेते मा.गो. वैद्य म्हणाले की, अलाहाबाद उच्च न्यायालयानेही मान्य केलेले आहे की, वादग्रस्त जागेवर राम मंदिर होते,तेथे उत्खननातही तसे पुरावे सापडलेले आहेत.सर्वोच्च न्यायालयाला हा वाद सोडविणे शक्य होत नसेल तर सरकारने कायदा बनवून राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा केला पाहिजे. निवडणूक निकालात उत्तरप्रदेशातील आकडे सर्वांना आश्‍चर्यचकीत करणारे होते. या राज्यात 15 वर्षांनंतर हा पक्ष तीनचतुथाँश बहुमत मिळवून पुन्हा सत्तेवर आला आहे. भाजपला 312 जागा मिलशल्या, तब्बल 37 वर्षांतर या राज्यात एखाद्या पक्षाला 300 पेक्षा जास्त जागा मिळालेल्या आहेत. वैद्य यांनी अप्रत्यक्षपणे संघाच्या उद्दीष्टांची पुन्हा आठवण करुन देण्यासाठीच हे विधान केलेले असल्याचे समजले जात आहे. सध्या भाजपमध्ये मोदी यांच्या धोरणांना प्रमाण मानणारा गट व संघाच्या धोरणांचा आग्रह धरणारा जुन्या नेत्यांना उचलून धरणारा दुसरा गट आपापल्या परीने भूमिका घेत असल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर मा.गो. वैद्य यांनी केलेल्या या विधानाला महत्व दिले जाते आहे