पुणे : पंढरीची वारी हा अवघ्या मराठी मनाचा श्वास आहे. याच वारीचे छायाचित्रांमधून दर्शन घडवणारे प्रदर्शन शहरातील बालगंधर्व कलादलानात मंगळवारपासून सुरू झाले. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, असे या प्रदर्शनाचे नाव आहे. संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन झाले. हे प्रदर्शन शुक्रवारपर्यंत सकाळी 9 ते रात्री नऊ या वेळेत सर्वांसाठी खुल आहे.