मुंबई: वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने प्राध्यापिका तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. तरुणीवर नागपुरात उपचार सुरु आहे. तरुणीला मदतीचे आवाहन केले जात आहे. प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी तरुणीचा सर्व वैद्यकीय खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली आहे. आनंद महिंद्रा यांनी इतरांनाही मदतीचे आवाहन केले आहे. आनंद महिंद्रा यांच्या या दातृत्वाचे सोशल मिडीयात जोरदार कौतुक होत आहे.
आजच वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांनी एका महिन्याचे मानधन तरुणीला देण्याची घोषणा केली आहे.