नागपूर: वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे प्राध्यापिका तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. संपूर्ण देशात यावरून संतापाची लाट पसरली आहे. जखमी तरुणीवर उपचार सुरु आहे. तरुणीची प्रकृती अध्याप गंभीर आहे. दरम्यान घटनेच्या पाचव्या दिवशी वर्धा जिल्ह्याचे खासदार पीडितेच्या भेटीला आले. खासदार रामदास तडस यांची नागपुरातील ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये जाऊन पीडित तरुणीच्या तब्येतीची चौकशी केली आहे. खासदार तडस यांनी एक महिन्याचे मानधन पीडितेला दिले आहे.
खासदार तडस यांनी गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना या संदर्भात माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्या नराधमाला फाशीची शिक्षा मिळावी या करिता कठोर कायदा करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले आहेत.पीडित तरुणीला केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त मदत कशी मिळेल यासाठी मी दिल्लीत तळ गाठून होते, अशी माहिती त्यांनी दिली आहे.