हिंगणीगाडा येथे डोळे तपासणी शिबीर

0

यवत । बारामती तालुक्यातील देवळगाव रसाळ येथील जीवन गौरव सेवाभावी प्रतिष्ठान व पुण्यातील बुद्राणी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये गावात व परिसरातील ग्रामस्थांसाठी मोफत डोळे तपासणी शिबीर पार पडले. यावेळी स्वस्त दरात चष्मा वाटप आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.

या शिबिरासाठी हिंगणीगाडा येथील डॉ. इकबाल शेख यांचे विशेष सहकार्य लाभले. 122 रुग्णांची तपासणी या शिबिरात करण्यात आली. या शिबिराला हिंगणीगाडा येथील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लहान मुले व वयोवृद्धांनीही या शिबीराचा लाभ घेतला. बुद्राणी हॉस्पिटलचे डॉ. वाघमारे यांनी रुग्णांची तपासणी केली. यावेळी जीवन गौरव सेवाभावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक वाबळे, जालिंदर खराडे, मोहन खराडे, सुनील खराडे, बाळासाहेब कदम आदी मान्यवर उपस्थित होते.