हिंगोणा गावातील दुहेरी हत्याकांड : पुराव्याअभावी संशयीत निर्दोष

भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाचा निर्णय

भुसावळ : यावल तालुक्यातील हिंगोणा शिवारातील जियाऊल हक इबादत अली यांच्या शेतात 25 जुलै 2017 रोजी झालेल्या दुहेरी हत्याकांडातील संशयीत आरोपी गुरुलाल पांगा बारेला याची भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.

अज्ञाताच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू
हिंगोणा येथे 25 जुलै 2017 रोजी सात वाजेच्या दरम्यान जियाऊल हक इबादत अली यांच्या शेतामध्ये मंगला दुर्गेश बारेला, दुर्गेश बारेला यांच्यावर एका अज्ञात आरोपीने हल्ला केला. त्या मंगला बारेलाचा जागीच मृत्यु झाला व साधारणतः चार ते पाच दिवसांनंतर दुर्गेश बारेलाचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला. या प्रकरणी संशयीत आरोपी गुरुलाल पांगा बारेला याचे नाव निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आली. भुसावळ सत्र न्यायालयात चाललेल्या खटल्यात 10 साक्षीदार तपासण्यात आले. सबळ पुराव्याअभावी आरोपी गुरुलाल पांगा बारेला याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपीतर्फे अ‍ॅड. प्रफुल्ल आर.पाटील यांनी कामकाज पाहिले. अ‍ॅड.संजीव पी.वानखेडे, अ‍ॅड.जया एस.झोरे, अ‍ॅड.दुर्गेश एस.लहासे यांनी सहकार्य केले.