हिंगोणा येथे महिलेचा खून

0

फैजपुर । तालुक्यातील हिंगोणा येथे किशोर वारके यांच्या शेतातील खळ्यात जवानसिंग नारसिंग बारेला वय 60 व दुधीबाई जवानसिंग बारेला कुडाच्या झोपडीत राहत होते. 13 रोजी जवानसिंग व दुधीबाई दोघांनी दारु प्रशान केली.रात्री 10.30 ते 14 च्या सकाळी 7.30 वाजे दरम्यान दोघांमध्ये वाद झाला.

जवानसिंग याने लाकडी दांडका व रबरी पट्टयाने दुधीबाईला दोन्ही पायाचे गुडघे व गुप्तांगावर मारहाण केल्याने ती जागीच मरण पावली. पुढील तपास एपीआय नेहते करत आहेत.