यावल- तालुक्यातील हिंगोणा शिवारातील लेंडी नाल्यात रविवारी दुपारी 45 ते 50 वर्ष वय असलेल्या अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला. या इसमाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याबाबत माहिती कळू शकली नाही. हा मृत्यू उष्माघाताने तर नाही ना? या दृष्टीने तपास सुरू आहे. या इसमाबाबत कुणाला काही माहिती असल्यास फैजपूर पोलिसांशी संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे. हिंगोणा पोलीस पाटील दिनेश बाविस्कर यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास उपनिरीक्षक ए.व्ही.निकुंभे करीत आहेत.