हिंगोणे खुर्द येथे पतीसह पत्नीस मारहाण

0

चाळीसगाव । तालुक्यातील हिंगोणे खुर्द येथे पंक्चर दुकानाचे गिर्हाईक हुसकावून लावतो या कारणावरून पती पत्नीस मारहाण करून पती च्या डोक्यावर व नाकावर लाकडी फळी मारून दुखापत केल्याची घटना 19 डिसेंबर 2016 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास हिंगोणे खुर्द गावात फिर्यादीच्या घरी व बस स्टॅन्ड जवळील दुकानासमोर घडली असून या वेळी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील टॉप्स तुटून पडून नुकसान झाल्या प्रकरणी 4 जणांविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पतीपत्नीस मारहाण करून केली शिवीगाळ
लहू हेमराज चव्हाण (38) यांचे हिंगोणे खुर्द बस स्टॅन्ड जवळ पंक्चर चे दुकान आहे व दुकान शेजारी भाऊसाहेब श्रावण चव्हाण यांची वडा पाव ची गाडी असते पंक्चर दुकानावर आलेले गिर्हाईक हुसकावून लावण्याच्या कारणावरून 19 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास फिर्यादी लहू हेमराज चव्हाण व त्यांच्या पत्नी यांना आरोपीनी घरी जाऊन मारहाण केली. तसेच दुपारी 12 वाजेच्या सुमारास त्यांच्या पंक्चर दुकानाजवळ त्यांना शिवीगाळ मारहाण करून आरोपी चेतन भाऊसाहेब चव्हाण याने त्याचे हातातील अडजात लाकडाची फळी त्यांचे डोक्यावर व नाकावर मारून गंभीर दुखापत केली आहे. मारहाण सोडविण्याकरिता त्यांच्या पत्नी गेल्या असता त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील टॉप्स तुटून पडून नुकसान झाले असल्याची फिर्याद लहू हेमराज चव्हाण यांनी दिल्यावरून आरोपी चेतन भाऊसाहेब चव्हाण, भाऊसाहेब श्रावण चव्हाण, सुमनबाई भाऊसाहेब चव्हाण, सविता योगेश्वर देवरे सर्व रा हिंगोणे खुर्द ता चाळीसगाव यांचे विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक शांतीलाल पगारे करीत आहे.