चाळीसगाव । तालुक्यातील हिंगोणे खुर्द येथे घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेवुन 3 अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटातील 20 हजार रुपये रोख व 6 हजार रुपये किमतीचा मोबाईल 11 फेब्रुवारी 2018 रोजी रात्री 2 वाजेच्या सुमारास चोरुन नेले असुन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी, तालुक्यातील हिंगोणे खुर्द येथे गुरे चोरीचे प्रमाण वाढल्याने संदीप निंबा पाटील 25 वेल्डींग काम हे दिनांक 11 फेब्रुवारी 2018 रोजी रात्रीचे जेवण आटोपुन घराचा दरवाजा उघडा ठेवुन रात्री 11 वाजता परिवारासह झोपले असतांना रात्री 2 वाजेच्या सुमारास त्यांच्या आईला घरातील लोखंडी कपाट उघडण्याचा आवाज आल्याने संदीप चव्हाण यांनी उठुन पाहीले असता 3 अज्ञात ईसम कपाटातुन चोरी करतांना त्यांना दिसले यावेळी आरडाओरडा केला असता चोरट्यांनी त्यांच्या अंगावर दगडफेक करुन लोखंडी कपाटातील 20 हजार रुपये रोख व 6 हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल घेवुन पलायन केले. चोरट्यांची उंची 5 फुटापर्यंत तर एकाच्या अंगात पांढरा शर्ट व दोघांच्या अंगात काळ्या रंगाचे श्वेटर होते याप्रकरणी संदीप चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अज्ञात 3 चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक भुपेश वंजारी करीत आहेत.