अमळनेर। तालुक्यातील हिंगोणे बुद्रुक येथील सरपंच शेवंताबाई रावण भिल यांच्यविरुद्ध शुक्रवार 24 मार्च रोजी उपसरपंच व 4 सदस्य यांनी अविश्वास ठराव मांडण्याबाबत तहसीलदार प्रदीप पाटील यांच्याकडे लेखी पत्र देण्यात आले. सदरच्या पत्रात सरपंच हे गाव हिताचे कुठल्याही काम करत नाही, सदस्य व नागरिकांना अरेरावीची भाषा वापरतात , ग्रामपांचायतच्या मासिक सभेत हिशोब देत नाही मागितल्यास तुम्हाला काही समजत नाही गावात स्वच्छता बाबत विचार करीत नाही.
सदस्य व नागरिकांना विश्वासात घेत नाहीत म्हणून सरपंच वर सदस्य व नागरिकांचा विश्वास राहिलेला नाही. सरपंच कर्तव्यात कसूर करतात तसेच अधिकाराचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोप उपसरपंच अर्चना महेंद्रसिंग पाटील सदस्य मनकरणाबाई खुशाल पाटील, निलाबाई रावण भिल, श्रीराम परशुराम भिल, ललिताबाई फकिरा थोरात, सत्यभामाबाई रामकृष्ण पाटील यांनी केला आहे.