चाळीसगाव । दुसर्याची जागा आपल्या नावावर करुन देण्यास नकार दिल्याचा राग येवुन तालुक्यातील हिंगोणे सिम येथे एकाने ग्रामसेवकास शिवीगाळ मारहाण करुन शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी तालुक्यातील हिंगोणे सिम ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सतीश रमेश बंडगर (38) हे बुधवारी 31 मे 2017 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात कामकाज करीत असतांना हिंगोणे सिम गावातील आरोपी चंद्रभान हिम्मत पाटील यांनी ग्रामसेवक बंडगर यांना दिनांक 31 रोजी सकाळी 11:30 वाजता निंबा भिका कोळी यांच्या मालकीची शेतातील 75ु21 फूट जागा त्यांच्या नावावर लावायला सांगीतले त्यावेळी बंडगर यांनी जागा कायदेशीर खरेदी करा मग तुमच्या नावावर लावतो असे बोलल्याचा राग येवुन चंद्रभान पाटील याने तु आमच्या गावात नोकरी कशी करतो असे बोलुन शिवीगाळ करुन चापटा बुक्याने मारहाण करत धमकी दिली व प्लास्टिकची खुर्चीत्यांच्या डोक्यावर मारुन शासकीय कामातअडथळा आणला यावेळी त्यांच्या गळ्यातील चैन तुटुन नुकसान झाले आहे. याप्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आरोपी चंद्रभान पाटील याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.