हिंजवडीत ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

0

हिंजवडी : भरधाव जाणार्‍या ट्रकची धडक दुचाकीला बसल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री पावणे दोनच्या सुमारास वाकड-हिंजवडी रस्त्यावर मातोश्री कार एक्सेसरीज समोर घडली. याप्रकरणी ट्रक चालकाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.

नागेश शिवाजी जोशी (वय 25, रा. वर्धमान ध्रुव अपार्टमेंट, थेरगाव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर गणेश दौलप्पा कनवळे (वय 35, रा. रुपीनगर, निगडी) असे अटक करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. याप्रकरणी उमेश पेडगावकर (वय 34, रा. थेरगाव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उमेश पेडगावकर यांचा मेहुणा नागेश हा त्याच्या दुचाकीवरून जात होता. त्यावेळी कनवळे हा त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव घेऊन जात होता. त्याच्या ट्रकची धडक नागेशच्या दुचाकीला बसली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.